चोपड्याचा 13 महिन्यांपासून बेपत्ता युवक अजूनही सापडेना..! 🔵शारदा नगरातील अर्जून रविंद्रकुमार पाटील कोणाला आढळून आल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन

 चोपड्याचा 13 महिन्यांपासून बेपत्ता युवक अजूनही सापडेना..!

🔵शारदा नगरातील अर्जून रविंद्रकुमार पाटील कोणाला आढळून आल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन

 चोपडा दि३०(प्रतिनिधी): चोपडा शहरातील शारदा नगर मधील वीस वर्षीय  युवक झारखंड राज्यातून रेल्वे प्रवास करताना अचानक बेपत्ता झाला आहे.एक वर्ष उलटूनी अद्यापी मिळून आल्याने कुटुंबियांच्या जीवाची घालमेल होत आहे. तरी  हा बेपत्ता युवक अर्जून रविंद्र पाटील हा कोणाला आढळून आल्यास चोपडा शहर पोलिसात अथवा  त्यांच्या वडिलांकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.

याबाबत पोलीसांकडून प्राप्त माहिती अशी की,टाटानगर रेल्वे पोलीस स्टेशन ता. घाटशिला जि. जमशेदपुर राज्य झारखंड (GRPS) गुन्हा रजि नं. 89/2025 भान्यास. कलम 137(2) प्रमाणे दि.30/08/2025 रोजी 16.05 वाजता गुन्हा दाखल झाला असून यातील तक्रार देणार रविंद्र कुमार भिमराव पाटील (वय 52 वर्ष रा.घर नं.04 शारदानगर चोपडा जि. जळगांव मो. नं. 9420112024) यांनी तक्रार दिली की ,दि.21/08/2025 रोजी सकाळी 11.35 वाजेच्या सुमारास मुलगा अर्जुन रविंद्रकुमार पाटील( वय 20 वर्ष रा.घर नं. 40 शारदानगर चोपडा जि. जळगांव) हा जळगांव येथुन शालिमार एक्सप्रेस ने जात असतांना घाटशिला रेल्वे स्टेशन ता. घाटशिला जि. जमशेदपुर ते टाटा नगर रेल्वेस्टेशन ता. घाटशिला जि. जमशेदपुर राज्य झारंखंड प्रवासा दरम्यान या ठिकाणी लघवी करुन येतो असे सांगुन रेल्वेतुन उतरला तेथुन कोठेतरी निघुन गेला त्यानंतर  रेल्वेत बसलाच नाही व आज पावेतो मिळून आला नाही अशा मजकुरावरुन टाटा नगर रेल्वे पोलीस स्टेशन ता. घाटशिला जि. जमशेदपुर राज्य झारंखंड येथे गुन्हा रजि.नं. 89/2025 भा.न्या.स. कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे . अपहृत मुलाचे नाव - अर्जुन रविद्रकुमार पाटील( वय 20 वर्ष रा.घर नं. 40 शारदानगर चोपडा जि. जळगांव)असे असून तो

शरिराने मध्यम उंची साधारण 5.5 फुट, रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, होठ लहान, कान छोटे, डोळे मध्यम, चष्मा लावलेला, अगांत काळ्या- पाढ-या रंगाचे फुल बाहिचे चेक्स शर्ट व काळ्या रंगाचे फुल पॅन्ट पायात सैंडल येणे प्रमाणे  वर्णन आहे.पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन डि. चौधरी हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने