तापी शेतकरी सहकारी सुतगणीला 58 लाखाचा नफा. : माजी आ. चेअरमन कैलासबापू पाटील
चोपडा,दि.30( प्रतिनिधी) तालुक्यातील तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीला यंदा 58 लाखाचा नफा राहिला असून जोपर्यंत शेतकऱ्यांचा कापूस या सूतगिरणीत खरेदी केला जाणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाहीत सहकार क्षेत्रातील हा एकमेव सुरू असलेला प्रकल्प शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे असे प्रतिपादन चेअरमन माजी आमदार कैलास बापू पाटील यांनी येथे केले. तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या 35 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलताना कैलास पाटील पुढे म्हणाले की, सुतगिरीला लवकरच कर्जातून मुक्त करू साखर कारखाना व सूतगिरणी दोन्ही प्रकल्प शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहेत असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. खेडीमेडीच्या वातावरणात आजची सभा पार पडली. सर्व सात विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. लक्ष्मी व शिवराय यांच्या तील चित्रास शेतकरी वर्गाकडून बळीराम लक्ष्मण पाटील , शामराव पोपट पाटील यांनी प्रतिमा पूजन केले कारखान्याचे उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील व सर्व संचालक तसेच शेतकरी संघाचे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती व पंचायत समितीचे माजी आजी-माजी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यकारी संचालक हेमंत पांडे यांनी विषयांचे वाचन केले. प्रास्ताविकातसंचालक संजय पाटील- यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन साहित्यिक रमेश पाटील यांनी केले.
यांची होती उपस्थिती...!
तापी शेतकरी सहकारी सुधारणेच्या वार्षिक सभेसाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कांतीलाल पाटील विद्यमान संचालक नंदकुमार भानुदास पाटील, शेतकी संघाचे मा. प्रेसिडेंट सुनील पाटील, प्रल्हाद पाटील रवी पाटील, रमाकांत बोरसे सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सूतगिरणीवर आज सहकार क्षेत्रातील विविध संस्थांचे मान्यवर पदाधिकारी कारखान्याचे अधिकारी कर्मचारी व शेतकरी सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
