दुष्काळाचे पार्श्वभूमीवर जळगावकरांना कर माफी देऊन दिलासा द्यावा गर्जना शाखेच्यावतीने मनपा आयुक्तांना निवेदन

 दुष्काळाचे पार्श्वभूमीवर जळगावकरांना कर माफी देऊन दिलासा द्यावा गर्जना शाखेच्यावतीने मनपा आयुक्तांना निवेदन 


जळगाव दि.1(प्रतिनिधी)राज्यभर दुष्काळाचे सावट असल्याने महापालिका आयुक्त यांनी विशेष सभा बोलावून यंदा जळगावकरांना   कर माफी देऊन दिलासा द्यावा अशी मागणी गर्जना शाखेच्यावतीने जिल्हाध्यक्ष सुभाष सोनवणे  व शाखा पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री साहेबांच्या दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्याच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर,  आयुक्त साहेबांना  जळगाव शहरातील सर्वसामान्य नागरिक, कामगार, छोटे व्यापारी व गरीब कुटूंबांना दिलासा देण्यासाठी विशेष महापालिका महासभा बोलवून घरपट्टी, पाणीपट्टी व इतर महापालिका करांमध्ये या वर्षी पूर्णपणे कर माफी देण्याचा ठराव मंजूर करावा.  सर्व सामान्य माणूस महागाई, रोजगाराची चिंता आणि वाढता घरखर्च यामुळे हवालदील असून आर्थिक संकटात सापडला आहे अशा परिस्थितीत महापालिकेने जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची हिम्मत दाखवुन  महासभेत विशेष ठराव मांडून कायद्यानुसार उपलब्ध तरतुदीनुसार घरपट्टी, पाणीपट्टी व इतर महापालिका करांमध्ये या वर्षी पूर्णपणे कर माफी द्यावी अशी मागणी केली आहे.

 शेतकरी, छोटे दुकानदार व कामगार वर्ग या दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असून, त्यांना तातडीची मदत आवश्यक आहे.उलटपक्षी जळगावकरांवर कराचा बोजा वाढवून अन्याय करू नये असेही त्यांनी म्हटले आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष - सुभाष सोनवणे ,शहर संघटक संजय भाटिया ,जिल्हा संघटक राजेंद्र चौधरी , रामसिंग भाऊ सोनवणे , कैलास दांगेज ,सचिन सोनवणे ,ज्ञानेश्वर सोनवणे , नंदकिशोर गवळी ,राजेंद्र तायडे ,बाबूलाल चच्हाण, विलास पाटील ,सोपान लेकर ,अशोक सोनार , सोपान माळी ,दिनेश बडगुजर ,सुनिल पाटील ,राजू चिंले ,राज तायडे, बापू पाटील  आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने