विशेष नारी सन्मान पुरस्काराचे नाशिकला 16 रोजी आयोजन..आडगावच्या पोलीस पाटील सौ संगीता गोविंद पाटील यांचा गौरव

 

विशेष नारी सन्मान पुरस्काराचे नाशिकला 16 रोजी आयोजन..आडगावच्या  पोलीस पाटील सौ संगीता गोविंद पाटील यांचा गौरव

चोपडा दि.८(प्रतिनिधी): विशेष नारी सन्मान पुरस्कार २०२६साठी चोपडा तालुक्यातील आडगाव येथील महिला पोलीस पाटील सौ संगीता गोविंद पाटील यांना गौरवण्यात येणार आहे. "माझी मी भारी" विशेष नारी  सन्मान पुरस्कार वितरण समारंभ नाशिक - राणी-भवन पंचवटी येथे 18 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता 51 पुरस्कारार्थींना हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यात सौ.संगीता ठलाल( गडचिरोली) श्रीमती उर्मिलाताई भाटे (पंढरपूर) श्रीमती सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या, तसेच धडाडी जिद्द संघर्ष व ध्येय बाळगून ज्या काही महिला आज पुढे आलेल्या आहेत अशा कर्तुत्वान महिलांचा या ठिकाणी गौरव होणार आहे. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शाल ,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असले तरी या पुरस्कारांच्या माध्यमातून या पुरस्कारार्थी महिलांना नवे बळ व शक्ती मिळणार आहे. इनहोटेशन मेकर्स अकॅडमी फाउंडेशन नाशिक या संस्थेद्वारे प्रोफेसर आशाताई बिरारी (पाटील )यांनी या, कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन केले आहे. पुरस्कारार्थी महिलांनी वेळेवर कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने