महाजन क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी दंत चिकित्सा कार्यक्रम संपन्न.. डॉ.राहूल साळुंखे यांनी केली मोफत तपासणी

 महाजन क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी दंत चिकित्सा कार्यक्रम संपन्न.. डॉ.राहूल साळुंखे यांनी केली मोफत तपासणी

चोपडा,दि.९(प्रतिनिधी) येथील महाजन इंग्लिश क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांसाठी दंत चिकित्सा शिबीर नुकतेच संपन्न झाले.तज्ञ दंत चिकीत्सक डॉक्टर राहुल साळुंखे यांनी विद्यार्थ्याची दंत तपासणी करून आरोग्य विषयी योग्य मार्गदर्शन करून दात किडणे, खराब असणे, दात तिरपे असणे या प्रकारांचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक पेस्ट दिला. 

महाजन क्लासेसचे संचालक दीपक महाजन म्हणतात की,इंग्रजी शिकवणे जेव्हढे महत्त्वाचे आहे तेव्हढेच  विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता मोहीम, भारत सरकारच्या खेलो इंडिया अंतर्गत विविध स्पर्धा, आरोग्य विषयी माहिती आदी उपक्रम गरजेचे आहेत त्यामुळे ते गेल्या बावीस वर्षांपासून अनेक उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपरोक्त कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी कुरवेल हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक बी आर पाटील ,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने