ज्येष्ठ धन्वंतरी , समाजसेवक ,स्वच्छता दूत डॉ.विकास हरताळकर यांना जीवनगौरव पुरस्कार
चोपडा,दि.८ (प्रतिनिधी ) येथील याज्ञवल्क्य मंडळ, पुरोहित संघ जागृती महिला मंडळ, चोपडा तर्फे ज्येष्ठ धन्वंतरी,स्वच्छतादूत,डॉ.विकास हरताळकर यांना याज्ञवल्क्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, प्रसिद्ध वक्ते प्रा.प्रकाश पाठक, चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव माधुरी मयूर, पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पंकज बोरोले ,याज्ञवल्क् मंडळाचे अध्यक्ष डी.व्ही.याज्ञिक सर,डॉ.विनीत हरताळकर,डॉ.अमित हरताळकर,सौ.ज्योस्ना हरताळकर,जागृती महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ.कांचन टिल्लू,यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
