घोडगावची कु.भुमिका पाटील हिस १०वी परिक्षेत 83.50 टक्के गुण

 

घोडगावची कु.भुमिका पाटील हिस १०वी परिक्षेत  83.50 टक्के गुण


चोपडा,दि.९(प्रतिनिधी) तालुक्यातील घोडगाव  येथील रहिवासी उमाकांत काशिनाथ पाटील यांची कन्या कु. भूमिका उमाकांत पाटील ही इयत्ता १०वी परिक्षेत शेकडा 83.50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली.
कु.भूमिका पाटील ही एन. एस, गर्ल्स  हायस्कूल, पारोळा  या शाळेत शिक्षण घेत असून इयत्ता 10 वी च्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
तिच्या यशाबद्दल शाळेचे चेअरमन वसंतकाका मोरे, शाळेचे मुख्यध्यापक व शिक्षक यांनी अभिनंदन केले. तसेच घोडगाव येथील प्रकाशदादा रजाळे, सूतगिरणी संचालक, संजय पाटील, विजू आबा पाटील, प्रा. विजयकांत पाटील, प्रशांतसर सोनवणे, प्रा. दिनेश पाटील, प्रा राहुल पाटील, यांच्या सहित अनेकांनी तिचे अभिनंदन करून कौतुक केले  .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने