भरधाव कालिपीली टॅक्सीची मोटार सायकलला ठोस..१५ वर्षीय तरुण ठार, २ जण जखमी

 भरधाव कालिपीली टॅक्सीची मोटार सायकलला ठोस..१५ वर्षीय तरुण ठार, २ जण जखमी 


चोपडा,दि.२८ ( प्रतिनिधी) धरणगाव कडून चोपड्याकडे सुसाट वेगाने येणाऱ्या कालीपिली टॅक्सीने दुचाकी हिरो फॅशन प्लस गाडीला  दिलेल्या जोरदार धडकेत    पंधरा वर्षीय तरुण जागीच गतप्राण झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना हॉटेल मानसीजवळ घडली.

याबाबत  प्राप्त माहिती अशी की, छोटू मंगा भील हा आपल्या ताब्यातील  मोटर सायकल क्रमांक एम एच.१८ वाय 2270  ही मोटार सायकल सर्वीसिंग  करून ट्रिपल सीट   चोपडा ते धरणगाव रोडने जात असताना अग्रवाल पेट्रोल पंपा वर पेट्रोल भरण्यासाठी मोटरसायकल घेऊन जात असताना मानसी हॉटेलच्या अलीकडे चोपड्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या काली पिली टॅक्सी ईको गाडी क्रमांक एम एच १९cx २८५३ वरील चालक नूर बेग मुराद बेग मिर्झा ( रा. भोकर वाडा,आशा टॉकी जवळ चोपडा) याने चार चाकी गाडी भरधाव व हयगयीने चालवून मोटरसायकलला जोरदार ठोस दिली त्यात अरूण छोटु भिल वय 15 (रा.  मराठे )हा मृत्युमुखी पडला. तर छोटू मंगा भिल (वय 54 वर्षे) व नरेंद्र राजेंद्र चव्हाण (वय 18) हे दोघे जखमी झाल्याची घटना घडली.जखमींना पुढील उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे 

याप्रकरणी शहर पोलिसात जखमी छोटू भील यांच्या फिर्यादीवरून सी सी टी एन एस गुरनं २२२/२०६ भारतीय न्यायदंड संहिता कलम 106 (1), 281,  125( अ),125 (ब), मोटार वाहन कायदा कलम 184, 134 ब प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे घटनास्थळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले  यांनी भेट दिली असून पुढील तपास पोउनि सचिन चौधरी हे करीत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने