चोपड्यात अनोळखी इसमाचा गटारवर मृत्यू .. ओळख पटविण्याचे आवाहन
चोपडा,दि.२८(प्रतिनिधी) शहरातील पंकज प्लाझा जवळील गटारवरसमोर 40 वर्ष वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबड उडाली आहे. सदरील मयताची ओळख पटलेली नसून कोणाला त्याची माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
याबाबत CMO डॉ. पवन पाटील उपरुग्णालय चोपडा यांनी खबर दिली की, चोपडा शहरातील पंकज प्लाझा परीसरातील घर मालक गोरख नामदेव पाटील यांच्या घरा समोर' गटारीवर एक बेवारस अनोळखी पुरुष जातीचे वय अंदाजे 35 ते 40 वयोगटातील त्यास दारुचे व्यसन असुन तो त्या व्यसनामुळे मयत अवस्थेत मिळून आला आहे. वगैरे मजकुराच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यु रजि. दाखल करण्यात आला आहे.
मयताचे वर्णन खालील प्रमाणे-
एक बेवारस अनोळखी इसम वय अंदाजे 35 ते 40 वयोगटाचा पुरुष इसम शरीराने सडपातळ असलेला. केस काळे, दाढी वाढलेली काळी, अंगात कुठल्याही प्रकारचे कपडे परीधान केलेले नाही हाफ चड्डी गुढघ्या पर्यंत तीला दोरी बाधलेली असून मळकट झालेली दिसत आहे. तो कदाचीत हमाल काम करणारा असावा असा त्यांचा पोशाख आहे. पायात काहीही घातलेले नाही. त्याच्या उजव्या हाताच्या कामेवर "नेनाभाई, राजुभाई, तुलसीराम, शंकर, नरसिंगा" असे गोंदलेले असुन डाव्या हाताच्या कामेवर स्यतश्रृंगी मातेचे चित्र, ओम, गोधलेले दिसत आहे. तसेच अंगावर कुठेही संशयीत निशाण्या दिसुन येत नाही.
अशा वर्णनाच्या एक बेवारस अनोखळी इसमाच्या नातेवाईकांचा तसेच वारसांचा व त्याचे नाव गाव पत्ता याची कुणाला ओळख असल्यास चोपडा शहर पोलिसात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.पुढील तपास परि.पोउनि युवराज वाळूंज हे करीत आहेत.
