श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त कीर्तनाचे आयोजन

 श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त कीर्तनाचे आयोजन


चोपडा,दि.३(प्रतिनिधी): श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज बांधव आयोजित किर्तन सोहळा दिनांक ५ ऑगस्ट बुधवार रोजी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची स्थापना माळी समाज मंगल कार्यालय या ठिकाणी होणार आहे 

या दिवसापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल ५ ऑगस्ट रोजी ह भ प सुनील महाराज जामनेर, ६ ऑगस्ट रोजी ह भ प शुभम महाराज मंदाने शहादा, ७ ऑगस्ट रोजी ह भ प उमेश महाराज दहिवद, ८ ऑगस्ट रोजी ह भ प श्रीकांत महाराज,खडके  ९ ऑगस्ट रोजी ह भ प गजानन महाराज सोनटक्के पारोळा, १० ऑगस्ट रोजी  ह भ प भानुदास महाराज भुसावळ, ११ ऑगस्ट रोजी ह भ प भावेश महाराज विटनेर, यांचे काल्याचे किर्तन लाभ मिळणार आहे, आणि दिनांक ८ ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी ६:०० वाजता माळी समाज मंगल कार्यालय या ठिकाणी माळी समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा होणार आहे, त्याचबरोबर दैनंदिन सप्ताह काकड आरती संध्याकाळी हरिपाठ होणार आहे दिनांक ११ ऑगस्ट गुरुवार रोजी सात ते आठ हजार भाविक बंधू सह सर्व समाज बांधवांसाठी महाप्रसादाच्या आयोजन केले आहे महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा त्याचबरोबर संध्याकाळी शहरातील विविध भागातून पालखी मिरवणूक सोहळा निघणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी श्रवणाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा अशी श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज बांधव च्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने