राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम यांच्या हस्ते १८ विद्यार्थ्यांना रोख शिष्यवृत्ती वाटप.. स्व.भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या स्मृतिदिनानिमित्त राबवितात हा स्तूत्य उपक्रम
चोपडा,दि.४(प्रतिनिधी)- माचले ता.चोपडा येथील गुळी नदी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आईसाहेब चिंधाबाई निंबाजी पाटील माध्यमिक विद्यालयात स्व.भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम यांच्या शुभ हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले ..
स्व.भाईसाहेब दिलीप देवराव निकम शिष्यवृत्ती या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या १८ विद्यार्थ्यांना एकूण १२ हजार २०० रुपयांच्या रोख शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागावी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे रोहित निकम यांनी यावेळी सांगितले.
स्व.भाईसाहेब दिलीप निकम यांनी कृषी व सहकार क्षेत्रात जो विचारांचा वारसा निर्माण केला, तो पुढे नेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशात योगदान देणे हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमास जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका श्रीमती शैलजादेवी दिलीप निकम, संस्थेचे अध्यक्ष प्रविण निकम, उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, सचिव घनश्याम निंबाजी पाटील, ‘सॉफ्टएड कॉम्प्युटर’चे संचालक रितेश निकम, ॲड. रविंद्र निकम तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षकवृंद, मुख्याध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
