पानशेवडी,खंडने, चांदणे तलाव पेसा गावातील विविध समस्यासाठी गावकऱ्यांचे आंदोलन.. बिडीओं केली चौकशी समिती गठित

 पानशेवडी,खंडने, चांदणे तलाव  पेसा गावातील विविध समस्यासाठी गावकऱ्यांचे आंदोलन.. बिडीओं केली चौकशी समिती गठित 


चोपडा,दि.२३(प्रतिनिधी) तालुक्यातील मोहरद ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या खंडाने, चांदणे तलाव व पानशेवडी या पेसा गावातील विविध मागण्यासाठी आज पंचायत समिती कार्यालयावर गावकऱ्यांनी मोर्चा काढला  त्या मोर्चाच्या समाधानाकरता गटविकास अधिकारी अंजली बर्गे यांनी तातडीने चौकशी समिती नेमून दि. ०१/०४/२०२६  रोजी गावात जाऊन चौकशी करून  वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले असून तुर्त न्यायाची वाट पाहावी लागणार आहे. 

चांदण्या तलाव, पानशेवडी खंडाने, ही गावे पेसा अंतर्गत असल्यावर सुद्धा अनेक पायाभूत सुविधा मिळत नसल्याने गावाकऱ्यांत संताप निर्माण झाला होता त्यामुळे त्यांनी विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावर तोडगा म्हणून गटविकास अधिकारी अंजली वर्ग यांनी चौकशी समिती गठित केली आहे त्यात श्री. के. यु. कुमावत, विस्तार अधिकारी (ग्रा.पं.),श्री.पी. जे. अहिरे, विस्तार अधिकारी (कृषी), ,श्री. डी. आर. डोखे, शाखा अभियंता (बांधकाम), पं. श्री. बी. व्ही. सुर्यवंशी, कनिष्ठ लेखाधिकारी यांचा समावेश असून तक्रारदार संजय गगनदास बारेला व गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची वस्तुनिष्ठ चौकशी करून चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.

यावेळी संजय गणदास बारेला, मगन भाया बारेला, भारत पामसिंग बारेला ,अनिल श्रीराम बारेला, वेहल्या वेरसिंग बारेला, महारू कलजी बारेला ,ईश्वर वेरसिंग बारेला, नानसिंग मदा बारेला, राजू भाया बारेला, वाहऱ्या पुसल्या बारेला, अशोक गुला  बारेला यांच्यासह 25 /30 महिला पुरुष उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने