अनेर नदीपात्रात बुडणाऱ्या चौघांना वाचवले, उमेशच्या धाडसाचे गावकऱ्यांनी केले कौतुक

 अनेर नदीपात्रात बुडणाऱ्या चौघांना वाचवले, उमेशच्या धाडसाचे गावकऱ्यांनी केले कौतुक 


गणपूर ,ता चोपडा दि. 23(प्रतिनिधी): येथील गावाच्या उत्तरेला असलेल्या अनेर नदी पात्रात खेळण्यासाठी गेलेल्या चार मुलांना नदीत पोहण्याचा मोह झाला आणि ते नदीत उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागल्याने तेथून घराकडे येणाऱ्या 14 वर्षीय उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील याचे लक्ष गेले.त्याने मोठ्या धाडसाने नदी पात्रात प्रवेश करत या चौघांना बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले. त्याच्या या धाडसा बद्दल गावकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.

 उमेश हा येथील सालगडी म्हणून काम करणाऱ्या रवींद्र साहेबराव पाटील यांचा मुलगा असून त्यांची घरची परिस्थिती बेताचीच आहे.उमेशच्या कामगिरीचे गावासह परिसरात कौतुक होत असताना त्याच्या कार्याची दखल शासनाने घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून विविध संस्था पदाधिकारी व गावकऱ्यांनी त्याचे कौतुक व अभिनंदन  केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने