चोपडा येथे स्वामी समर्थ केंद्रात महाप्रसाद वाटप
चोपडा दि. 23 (प्रतिनिधी)चोपडा येथील स्वामी समर्थ केंद्रात नुकताच श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिना निमित्त सकाळी पाच वाजता सामुदायिक पादुका पुजनाची सेवा घेण्यात आली नंतर स्वामी याग साळे दहा वाजता महा नैवेद्य आरती येथील सेवेकरी दिलीप पाटील व सौ उर्मीला दिलीप पाटील यांच्या शुभ हस्ते महा आरती करण्यात आली यावेळी केंद्र प्रमुख आर बी पाटील अशोक सनेर गुरुदत्त निंबाळे यांनी सेवा मार्गा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी केंद्रात सर्व शेकडो महिला व पुरुष सेवेकरी उपस्थित होते .यावेळी सर्व सेवेकऱ्याना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .
