आयडियल इंग्लिश अकॅडमी चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
♦️ मोटू पटलू "शो"ने वेधले विद्यार्थी व पालकांचे लक्ष
चोपडा दि.२३(प्रतिनिधी): दिनांक 22 मार्च रोजी शहरातील शरद चंद्रिका नाट्यगृहात आयडियल इंग्लिश अकॅडमी चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी श्री .अक्षय पाटील हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा, भाषिक उपक्रम, व्याकरण परीक्षा यांची बक्षीसे व विविध पुरस्कार देण्यात आले.
यात प्रामुख्याने इंग्लिश ओलिंपियाड, स्पेलिंग बी, इंटरनॅशनल इंग्लिश ग्रामर, , GTS, CTH,CPL, आयडियल स्टुडन्ट ऑफ द इयर, आयडियल सुपर स्पेलर्स, आयडियल सुपर रीडर्स, आयडियल बेस्ट बुक कीपर्स असे विविध पुरस्कार देण्यात आले. विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. अकॅडमी चे संचालक श्री पद्माकर पाटील यांनी प्रास्ताविक व अतिथी परिचय करून दिला तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ अक्षय पाटील यांनी विद्यार्थ्यांना साधारण परिस्थितीतून ग्लोबल लेवल पर्यंत पोहोचण्यासाठी परिश्रम व भाषा यांची जोड असणे आवश्यक आहे हे नमूद केले. कार्यक्रमासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांना पारितोषिक स्वीकारताना फार आनंद झाल्याचे दिसून आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण होते. सर्व स्वयंसेवक, कमिटी स्टुडंट्स यांनी शिस्तप्रिय पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला व पार पाडला.मोटू पटलू वेशभूषा असणाऱ्या कलाकारांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे मनोरंजन केले.
अकॅडमी नाविन्यपूर्ण पद्धतीने कौशल्यवान व आधुनिक विद्यार्थी घडवण्यावर जोर देत असते. संचालक श्री पद्माकर पाटील यांचा इंग्रजी विषयाच्या कौशल्यांवर आधारित अध्यापनावर जोर असल्यामुळे अकॅडमी पालकांच्या पसंतीची बनलेली आहे.
