ज्येष्ठ नागरिक संघात महिलांचा सत्कार सोहळा संपन्न
चोपडा,दि.२३(प्रतिनिधी) ज्येष्ठ नागरिक संघात दि.२२मार्च२०२६ रोजी महिलांचा सत्कार सोहळा पार पडला.यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ नम्रता पाटील, व चोपडा नगर परिषद मध्ये नवनिर्वाचित नगर सेविका यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष सौ.ताराताई, पाटील,माजी नगरसेविका सौ.राधा जयदेव देशमुख, ज्येष्ठ सदस्या श्रीमती नलिनीताई बारोट, सौ.नलिनीताई देशमुख, सौ.रजनीताई बडगुजर, विनीता करण्यात आला.गुजराथी, सौ. रेखा बजाज. सौ.कुंदा डोंगरे, कविता देशमुख,यांनी केले. त्यांना महिला दिनाच्या निमित्ताने स्मृती चिन्ह, पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख व्याख्यात्या सौ.योगिता पाटील व सौ स्वाती बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री जयदेव देशमुख, कोषाध्यक्ष श्री.दिलीपराव पाटील, उपाध्यक्ष श्री नेरपगारे , सचिव श्री विलास पाटील सर,श्री विलास सु.पाटील, श्री.श्यामभाई गुजराथी, गोविंदा बापू महाजन, राजेंद्र साळुंखे, श्री.गोकुळ पाटील , पेंढारकर नाना, प्रा. एस .एम.पाटील सर, श्री तात्यासाहेब रमेश शिंदे,श्री , जगन्नाथ पाटील सर, श्री.एन .डी.महाजन सर. श्री. राजनभाई गुजराथी, रविंद्र गुजराथी, श्री.प्रमोद डोगरे, शांताराम नाना,श्री रमेश देशमुख, श्री.आधार माळी , इतर सभासद हजर होते. प्रास्ताविक श्री जयदेव देशमुख यांनी तर सुत्र संचालन विलास पाटील सरांनी केले. प्रार्थना महाजन यांनी तर आभार प्रा.शामभाई गुजराथी यांनी केले.
