अमळनेर मराठा समाज महिला मंडळाचा महिला दिन व पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा
अमळनेर,दि.२३(प्रतिनिधी) मराठा समाज महिला मंडळाने ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च रोजी महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे सौ. रेखाताई पाटील ,संस्थापक अध्यक्ष सौ. तिलोत्तमापाटील, संचालिका सौ. जयश्री पाटील अध्यक्ष सौ. शीला पाटील व संचालिका यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले त्यानंतर संस्थापक अध्यक्षा सौ.तिलोत्तमा पाटील यांनी प्रास्ताविक मांडले ज्यात मंडळाच्या दहा वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला व मराठा समाजातील महिलांना व्यासपीठ मिळावे , त्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागावा या उद्देशाने मंडळाची स्थापना केल्याचे सांगितले .चोपडा येथील पंकज महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रेखाताई पाटील यांनी महिलांना उद्बोधन पर व्याख्यान दिले जात बदलत्या काळातील पालकांची जबाबदारी व मराठा समाजातील लग्न व्यवस्था या अनेक विषयावर त्यांनी उपस्थितना मार्गदर्शन केले. मंडळाच्या खजिनदार सौ.पद्मजा पाटील यांनी मागील वर्षाचा आर्थिक व कार्यक्रम अहवाल सादर केला. त्यानंतर यावर्षीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली मंडळाचे अध्यक्ष म्हणून सौ सुलोचना पाटील यांची निवड करण्यात आली
उपाध्यक्षा सौ. मंगल पाटील व सौ. भारती पाटील(डि आर कन्या शाळा) यांची निवड झाली सचिव म्हणून सौ कमल अक्का पाटील व खजिनदार म्हणून सौ भारती पाटील (आधार संस्था )यांचे 2026 नवनिर्वाचित पदाधिकारी म्हणून निवड झाली. तसेच मंडळाच्या कार्यकारिणीत सौ. स्वप्ना पाटील, सौ. राजश्रीपाटील सौ. सविता आहेर, प्रा. नलिनी पाटील, सौ. गायत्री भदाणे, सौ कृपाली पाटील व सौ. दीपिका सोनवणे यांचे कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.माजी अध्यक्ष
सौ. शीला पाटील यांनी आपले आभार पर मनोगत व्यक्त केले. नवीन अध्यक्ष सौ सुलोचनाताई पाटील यांनी अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानत सर्वांचे सहकार्याने पुढील वर्षी कार्यक्रम घेण्याचे सांगितले.
मंडळाचे परंपरेनुसार दरवर्षी महिला दिन कार्यक्रमात वर्षभरात उल्लेखनीय कार्य केलेल्या तसेच विविध पदांवर निवड झालेल्या विविध बक्षीस मिळालेल्या मराठा समाजातील भगिनींचा सत्कार करण्यात येतो त्यानुसार यावर्षी पिंपळे येथील सरपंच सौ वर्षा पाटील नवनिर्वाचित नगरसेविका सौ जयश्री पाटील व सौ स्वप्ना पाटील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौ. सुलोचना वाघ तसेच खा.शी. मंडळात निवडून आलेल्या संचालिका सौ. लीना पाटील व उपाध्यक्षा श्रीमती माधुरी पाटील यांच्यासह
सौ.कामिनी पवार ,सौ.सुनिता पाटील, सौ.अनिता काळे, सौ.पूजा पाटील, सौ.रजनी पाटील, सौ.पद्मजा पाटील ,डॉ भारती पाटील, सौ.रूपाली पाटील, सौ.पल्लवी पाटील ,सौ.योगेश्वरी पाटील, सौ. श्वेता पाटील, डॉ. प्रा. नलिनी पाटील ,सौ. वैशाली निकम, सौ.ज्योती पाटील, सौ. सुदर्शना पाटील, सौ. माधुरी देशमुख, सौ. सुवर्णा पाटील, सौ वैशाली पाटील, राणी लक्ष्मीबाई ग्रुपच्या सौ. ज्योती पवार ,सौ.माधुरी पाटील सौ पूर्वा देसले, सौ. पूनम पाटील, सौ. मनीषा महाले यांचा विशेष प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ भारतीताई पाटील , सौ. मनीषाताई पाटील व सौ. रागिनीताई महाले यांनी केले कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट नियोजन सौ.लीना पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती माधुरीताई पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंडळाच्या संचालक सौ. सुनीताताई पाटील, सौ. प्रभा पाटील यांनी प्रयत्न केले
