चोपडा येथे पं.आप्पासाहेब जळगावकर संगीत महोत्सव संपन्न

 चोपडा येथे पं.आप्पासाहेब जळगावकर संगीत महोत्सव संपन्न


चोपडा,दि.२३(प्रतिनिधी) :-  भारतीय शास्त्रीय संगीत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संवादिनी वादक दिवंगत आप्पासाहेब जळगावकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिष्य परिवाराच्या वतीने संपूर्ण देशभर विविध संगीत महोत्सवाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून श्री.संत गजानन बहुद्देशीय संस्था चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित आप्पासाहेब जळगावकर संगीत महोत्सवाचे आयोजन दिनांक 20 मार्च 2020 रोजी आक्कासो.सौ शरच्चंद्रिका सुरेश पाटील नाट्यगृह येथे 18 वे पुष्प आयोजित करण्यात आले. 

संगीत महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ शल्यचिकित्सक डाॅ.विकास हरताळकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन श्री.चंद्रहास गुजराथी होते.प्रमुख अतिथी म्हणून शांताराम भाऊलाल पाटील,हितेंद्र देशमुख राजाराम पाटील उपस्थित होते. महोत्सवाची सुरुवात श्री.विवेक बाविस्कर यांनी पुरिया धनश्री या रागाने केली. दुसऱ्या सत्रात महोत्सवात संतोष अत्रे,पुणे यांचे सॅक्सोफोन संजय भावे, पुणे यांचे हार्मोनियम सह वादन झाले. यानंतर आप्पासाहेब जळगावकर यांचे ज्येष्ठ शिष्य उपेंद्र सहस्रबुद्धे यांचे एकल हार्मोनियम वादन व महोत्सवाचा समारोप छत्रपती संभाजीनगर येथील पंडित विश्वनाथ दाशरथे व कु. शाल्मली दाशरथे यांच्या शास्त्रीय गायनाने झाला. सदर महोत्सवात तबला साथसंगत अभिजीत खेरडे, पुणे व नरेंद्र भावे,चोपडा यांनी केली. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष मनोज चित्रकथी, सचिव विजय पालीवाल, भागवत जाधव, सतीश पाटील, विवेक बाविस्कर, गोपाल निकम, निलेश कुंभार, गणेश कोळी, प्रेम वाघ, सुयश मगरे, पियुष पाटील, राधेश्याम कंडारे, प्रथमेश पाठक आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.योगेश चौधरी यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने