अकुलखेडा गावी प्रेम प्रकरणातून पिस्तूलातुन गोळी झाडून महिलेची हत्या..प्रेमीने स्वतःस ही संपविले..

 अकुलखेडा गावी प्रेम प्रकरणातून पिस्तूलातुन गोळी झाडून महिलेची हत्या..प्रेमीने स्वतःस ही संपविले..

चोपडादि.२८(प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील अकुल खेडे येथे प्रेम प्रकरणातून प्रियेसीवर गावठी पिस्तूलातून गोळी झाडून हत्या करून स्वतः ला गोळी मारून जीवनयात्रा संपवल्याची थरारक घटना घडली.शाळेतून परत आलेल्या मुलीला दोघं ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने प्रचंड आक्रोश करीत बाहेर पडल्यानंतर घटनेची माहिती समोर आली आहे.

 याबाबत प्राप्त माहिती अशी की,अकुलखेडा येथे जगदीश काशिनाथ पाटील यांच्या राहत्या घरात अनिता जगदीश पाटील व देवा सुरेश धनगर नामक व्यक्ती रक्तबंबाड अवस्थेत त्याच्या घरात आढळून आले. 

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास जगदीश काशिनाथ पाटील यांची मुलगी शाळेतून घरी परत आल्यानंतर तिने रक्तात माखलेले दोघे मृतदेह पाहून हंबर्डा फोडला आणि घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली.

जगदीश काशिनाथ पाटील यांची पत्नी अनिता जगदीश पाटील व देवा सुरेश धनगर यांचे आपसात सोशल इंस्टाग्रामचा माध्यमातून प्रेम प्रकरण जुडलेले होते. काही दिवसांपासून प्रेयसी अनिता ही देवा धनगर यांना वेळ देत नसल्या कारणाने रागातून देवा धनगर यांनी रागाच्या भरात अनिता पाटील यांच्या राहत्या घरी अकुलखेडा येथे जाऊन गावठी पिस्टलने अनिताच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली. आणि नंतर स्वतःवरही देवा धनगर याने गोळी झाडून स्वतःलाही संपवले.

घटनास्थळी मयत देवा धनगर यांची दुचाकी आढळून आली ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली. घटनेची माहिती मिळतातच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे ठेवण्यात आले. पुढील तपास अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर सावळे हे करीत आहेत. दोघांच्या मृतदेहांना पोस्टमॉर्टमासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने