संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित खाजगी आदर्श पूर्व प्राथमिक शाळेत विविध स्पर्धा बक्षीस वितरण संपन्न

 संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित खाजगी आदर्श पूर्व प्राथमिक शाळेत विविध स्पर्धा बक्षीस वितरण संपन्न 


अडावद,ता.चोपडा दि.२७(प्रतिनिधी) : संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित खाजगी आदर्श पूर्व प्राथमिक शाळेत गेल्या महिन्यात क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

 विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना दाद मिळावी शारीरिक आणि बौद्धिक  विकास  या साठी सर्व शिक्षक वृंद यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते .यात बुक बॅलन्स स्पर्धा, संगीत खुर्ची ,गाढवाला शेपूट लावणे ,खो खो, रनिंग अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात सहभाग घेतला दि. 27 रोजी बक्षीस वितरण करण्यात आले.बक्षीस वितरण हे सुद्दा तितके महत्वाचे असते कारण छोटंसं बक्षीस विद्यार्थ्यांच्या  मनाला नवीन प्रेरणा देते आपल्यातील विविध कलागुण अजून जागृत होण्यास प्रोत्साहन मिळते हा या मागील उद्देश आहे...या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक डी बी महाजन हे होते. याप्रसंगी श्री आर जे महाजन,श्री एस टी महाजन, वाय एल साळुंखे डी आर वाघ कामिनी चौधरी हे यांचे मोलाचे सहकार्य लाभले . सूत्रसंचालन मेघना महाजन यांनी तर  आभार प्रदर्शन पुनम सुतार यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने