नगरसेवक सुनील चौधरी यांच्या कडून प्रभाग ८ व ९ मधील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके वाटप

 नगरसेवक सुनील चौधरी यांच्या कडून प्रभाग ८ व ९ मधील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके वाटप  


धरणगावदि.२७(प्रतिनिधी) धरणगाव नगरपरिषदचे लोकनियुक्त व लोकप्रिय नगरसेवक सुनीलभाऊ चौधरी यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक ८ व ९ मधील इयत्ता तिसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध नामांकित लेखकांची पुस्तके मोफत वाटप करण्यात आली.

   या उपक्रमामागील प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अति वापरापासून दूर राहून वाचनाची सवय लावावी,ज्ञानाची कक्षा रुंदावावी आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करावी हा होता.आपल्या भाषणात सुनिलभाऊ चौधरी यांनी स्पष्ट केले की,मोबाईल क्षणिक आनंद देतो,पण पुस्तक आयुष्यभराचा मार्गदर्शक ठरतो.वाचन संस्कृती जोपासली तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल.

             कार्यक्रमास डोंगर चौधरी, जिजाबराव पवार,एकनाथ आबा पाटील,राजेंद्र बोरसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.मान्यवरांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पप्पू भाटिया,बंटी देशमुख व नंदिनी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

                या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,धरणगाव शहरात वाचन संस्कृतीला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. हा स्तुत्य उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने