मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय ; २२ ते २५ मार्च दरम्यान ‘एसआयआर मॅपिंग’चे काम मिशन मोडवर

 मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय ; २२ ते २५ मार्च दरम्यान ‘एसआयआर मॅपिंग’चे काम मिशन मोडवर 


चोपडा,दि.२२(प्रतिनिधी) निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, मतदार यादीतील अचूकता वाढवण्यासाठी आणि मतदारांच्या सोयीसाठी ‘एसआयआर मॅपिंग’ (SIR Mapping) ही मोहीम आता तीव्र करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या २२ मार्च ते २५ मार्च या कालावधीत सर्व बीएलओ (BLO - Booth Level Officers) यांना हे काम ‘मिशन मोड’ मध्ये पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 काय आहे ही मोहीम? 

एसआयआर मॅपिंगद्वारे प्रत्येक मतदाराचे घर आणि त्याचे संबंधित मतदान केंद्र यांचे भौगोलिक स्थान निश्चित केले जाते.   सध्या 2024 मतदार यादीतील नावे 2002 च्या मतदार यादीतील नावांशी मॅपिंग बी एल ओ मार्फत करण्यात  येत आहे. ज्या मतदारांची नावे 2002 च्या यादीत नाहीत परंतु 2024 च्या यादीत आहेत. अशा मतदारांना आपल्या आई-वडील किंवा आजोबा  यांच्या 2002 मधील नावांची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच मतदारांचे मतदार यादीतील अस्पष्ट फोटो (Blure photo) किंवा नावातील किंवा अन्य दुरुस्त्या, तसेच दुबार मतदार, मयत मतदार, स्थलांतरित मतदार यांचे नावे मतदार यादीतून कमी करणे अशा सर्व प्रकारची कार्यवाहीयामुळे मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधणे सोपे होणार असून, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यास मदत मिळणार आहे.

 ठळक मुद्दे: 

♦️कालावधी: २२ मार्च ते २५ मार्च २०२६.

♦️सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि बीएलओ यांचा सक्रिय सहभाग. ♦️प्रत्येक घराचे मॅपिंग करून मतदार यादीतील पारदर्शकता वाढवणे.

 प्रशासकीय ताकीद : दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

 या मोहिमेदरम्यान बीएलओ आपल्या घरी आल्यास त्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, सदर आढावा बैठकीत  श्री. भाऊसाहेब थोरात (तहसीलदार), श्री. रामनिवास झंवर (मुख्याधिकारी), श्री. सुधाकर पाटील (नायब तहसीलदार), श्री. संजय मिसर (उपमुख्याधिकारी) आणि श्री. संदीप पाटील सर यांनी सर्व बीएलओ आणि संबंधित कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले आहे. कामात अचूकता राहावी आणि विहित मुदतीत उद्दिष्ट पूर्ण व्हावे, यासाठी या अधिकाऱ्यांकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने