लासूर गावात संगीतमय वाल्मिकी श्रीराम कथेची भव्य सुरुवात ; प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

 लासूर गावात संगीतमय वाल्मिकी श्रीराम कथेची भव्य सुरुवात ; प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

चोपडा,दि.२२(प्रतिनिधी) तालुक्यातील लासूर गावात नव्याने उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य श्रीराम मंदिरात श्रीराम, लक्ष्मण व सीता मातांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज (दि. २१) अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.या निमित्ताने सकाळी गावभर वाजत-गाजत कलश मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभाग नोंदविला.

प्राणप्रतिष्ठेनंतर संगीतमय महर्षी वाल्मिकी श्रीराम कथेचीही मंगल सुरुवात करण्यात आली. सात दिवस चालणाऱ्या या कथेचा समारोप सातव्या दिवशी होणार असून, संपूर्ण रामायण कथा रसिकांना ऐकायला मिळणार आहे.

संगीतमय सादरीकरणामुळे कथेचे वातावरण अधिकच भक्तिमय व आकर्षक बनले आहे. गावातील आबालवृद्ध, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथेचा लाभ घेतला.

या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे लासूर गावात सध्या उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून, भक्ती आणि श्रद्धेचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने