हातेड बु. येथे 26 मार्च ते 30 मार्च 2026 दरम्यान रामलीला उत्सवाचे भव्य आयोजन
हातेड बुद्रुक ता.चोपडा दि.२२(प्रतिनिधी)आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या हातेड बु. येथे 150 वर्षांपासून चालत आलेली श्री रामलीला उत्सवाची गौरवशाली परंपरा यावर्षीही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात येणार आहे.
गावातील नागरिकांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या उत्सवात भगवान श्रीरामांच्या जीवनावर आधारित विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांसाठी हा उत्सव श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा संगम ठरणार आहे. हा भव्य उत्सव दिनांक 26 मार्च 2026 ते 30 मार्च 2026 रात्री 8 ते 12 या कालावधीत पार पडणार असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन रामलीला उत्सव समिती आयोजकांकडून करण्यात येत आहे.
*संस्कृतीचा अभिमान* *जोपासण्याची परंपरा*
गेल्या दीडशे वर्षांची गौरवशाली परंपरा जपत गावातील समर्पित पात्रेकरू, कलाकार व ग्रामस्थांच्या सहभागातून साकार होणारा भक्ती, संस्कृती व कलेचा अद्भुत संगम
*पारंपरिक भूमिका वेशभूषा जिवंत नाट्य सादरीकरण*
रामायणातील विविध प्रसंगांचे भव्य सादरीकरण आणि गावाच्या समृद्ध संस्कृती व परंपरेचे दर्शन
