हर्षदा कोल्हटकर यांना राज्य हिंदी नाट्यस्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाबद्दल गुणवत्ता प्रमाणपत्र
गणपूर,ता चोपडा दि.२२(प्रतिनिधी): येथील मूळ रहिवासी व नोकरी निमित्त जळगाव येथे स्थायिक झालेले हर्षदा रामकृष्ण कोल्हटकर यांना 64 व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत उत्कृष्ट अभिनयाबद्दल गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर झाले आहे.
3 फेब्रुवारी2026 ते 16 मार्च2026 दरम्यान वनामती, नागपूर येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या राज्य हिंदी नाट्य स्पर्धेत अंतिम फेरी नंतर विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले.त्यात उत्कृष्ट अभिनयाबद्दल हर्षदा कोल्हटकर यांना गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर झाले आहे.या स्पर्धेत राज्यातून एकूण 58 नाट्य प्रयोग सादर करण्यात आले होते.
त्या येथील मूळ रहिवासी व जळगाव स्थित सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक रामकृष्ण कोल्हटकर यांच्या कन्या आहेत.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
