चोपड्यात एकाच दिवसात ३ घर फोड्या..४लाख८६ हजारांचा ऐवज चोरी

 चोपड्यात एकाच दिवसात ३ घर फोड्या..४लाख८६ हजारांचा ऐवज चोरी

चोपडा दि.18(प्रतिनिधी): शहरातील अशोक नगर,तारामती नगर आणि इंदिरा नगर भागात बंद घरांचे कुलूप तोडून तब्बल चार लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली  आहे.

 याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्यादी अनिताबाई ईश्वर धनगर (49, रा. अशोक नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या 15 मार्च 2026 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटातून सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख 86 हजारांचा ऐवज चोरून नेला.  तसेच परिसरातील तारामती नगर आणि इंदिरा नगर भागातील इतर बंद घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले.

घरफोडीची माहिती मिळताच चोपडा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अनिताबाई धनगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या मोठ्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने