आज चहार्डीत रा.स्व.संघाचे संचलन,शताब्दी निमित्त उत्सव

 आज चहार्डीत रा.स्व.संघाचे संचलन,शताब्दी निमित्त उत्सव


चोपडा,दि.१९(प्रतिनिधी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपली शताब्दी साजरी करीत असतांना हिंदु वर्षाचा प्रारंभ करणारा वर्ष प्रतिपदा महोत्सव आज दि.१९ रोजी चहार्डी ता.चोपडा येथे पथसंचलन आणि बौध्दीक मेजवाणीने साजरा होणार आहे.दुपारी साडेचार वाजता चहार्डीच्या अमृतेश्वर महादेव मंदिरात साजरा होणार आहे.यावेळी जिल्हा गोसेवा प्रमुख सुदाम चौधरी यांचे बौध्दीक होणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोरमळी ता.चोपडा येथील प्रगतीशिल शेतकरी बाबुराव पावरा उपस्थित राहणार आहेत.यावेळी उपस्थितीचे आवाहन तालुका कार्यवाह ज्ञानेश्वर सैंदाणे,मंगेश धनगर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने