कर्मवीरमध्ये "छत्रपती संभाजी महाराज व रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी" उत्साहात साजरी
वसई ,दि.१९(प्रतिनिधी): रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस.पी. ज्युनियर कॉलेज,जुचंद्र येथे बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी 'लक्ष्मीबाई भाऊराव पाटील व छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी "मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. आपल्या प्रास्ताविकेतून श्री संजय म्हात्रे सर यांनी व सौ.सुजाता पाटील मॅडम यांनी आपल्या मनोगतातून सौ. लक्ष्मीबाई पाटील यांनी बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी केलेल्या त्यागाचा गौरव केला. विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून सौ. लक्ष्मीबाई पाटील व छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली वाहिली. तसेच प्राध्यापक श्री. मंगेश मस्के सर यांनी आपल्या मनोगतातून संभाजी महाराजांचे धैर्य आणि स्वराज्य रक्षणार्थ दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून दिले. विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री. विलासराव जगताप सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विवेकानंद पाटील साहेब यांनीही आपल्या मनोगतातून सौ. लक्ष्मीबाई पाटील व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची महती अधोरेखित केली. तसेच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरलेली इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी कुमारी भोईर आराध्या हितेश व विभाग प्रमुख सौ ज्योती गवारी मॅडम यांचा सन्मान श्री. विवेकानंद पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.विसावे मॅडम यांनी केले व मान्यवरांचे आभार सौ. प्रणिता रणदिवे मॅडम यांनी मानले .
