विवाहा निमित्त रा.स्व.संघाला मंगलनिधी प्रदान गरताडच्या विवाह सोहळ्यात वेगळ्या प्रेरणा

 विवाहा निमित्त रा.स्व.संघाला मंगलनिधी प्रदान गरताडच्या विवाह सोहळ्यात वेगळ्या प्रेरणा


चोपडा,दि.२३(प्रतिनिधी) - तालुक्यातील गरताड येथे दि.२२ फेब्रुवारीला सामाजिक कार्यकर्ते शशिकांत नारायण पाटील यांचे सुपुत्र चि.अक्षय व चि.आशिष यांच्या लग्नानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने कार्य करणा-या सेवाभावी संस्थांना ५१ हजार रूपयांचा मंगलनिधी प्रदान करण्यात आला.

नवपरिणीत चि.अक्षय हा कॅनडात व्यवसाय करतो.तर चि.आशिष देखील उच्चशिक्षित आहे.दोघे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून  स्वयंसेवक आहेत.त्यामुळे संघ विचारांना चालना देण्यासाठी त्यांच्या आग्रहास्तव त्यांचे वडील शशीकांत पाटील यांनी संघ विचारांच्या संस्थांना मदत म्हणून ५१ हजारांचा निधी धनादेशाद्वारे जिल्हा संघचालक डॅा.मनोज साळूंखे यांना वरांचे आजोबा नारायण तंगा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी संघाचे विभाग संघचालक राजेश पाटील,वरांचे काका ज्ञानेश्वर पाटील,ॲड.दुर्गादास पाटील,प्रा.एच.ए.पाटील यांचेसह अनेक राजकिय पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,आप्तेष्ट उपस्थित होते.नवपरिणित वरांचे सामाजिक भान...सकारात्मक आदर्श ठेवल्याबद्दल तालुक्यात व समाजात चर्चेचा विषय ठरला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने