चोपडा ज्येष्ठ संघ पदाधिकाऱ्यांनी राबविले ग्राम स्वच्छता अभियान

 चोपडा ज्येष्ठ संघ पदाधिकाऱ्यांनी  राबविले ग्राम स्वच्छता अभियान 


चोपडा दि.२३(प्रतिनिधी)चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात आज दिनांक २३/२/२०२६ रोजी सकाळी १०वाजता संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

 संघाचे अध्यक्ष श्री जयदेव  एन. देशमुख यांनी संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेचे पूजन करुन माल्या अर्पण करण्यात आले. या स्वच्छता अभियानात  जेष्ठ सदस्य  माजी अध्यक्ष श्री विजय करोडपती , उपाध्यक्ष श्री.जिजाबराव नेरपगारे , श्री.दिलीपराव नाना पाटील, माजी सचिव श्री.प्रमोद डोंगरे, सचिव श्री.विलास पाटील , ज्येष्ठ सदस्य श्री.गोविंदा  महाजन,श्री. राजेंद्र साळुंखे,श्री.गोकुळ पाटील साहेब, परशूराम पेंढारकर ,प्रा.श्री . सुधाकर पाटील यांनी हिरीरीने भाग घेत परिसर चकाकून सोडला.खुद्द ज्येष्ठ नागरिक  साफ सफाई करतांना दिसून आल्याने धडधाकटांनी आदर्श घ्यावा असे चित्र अनेकांना बघावयास मिळाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने