विवेकानंद विद्यालय चोपडा शाळेच्या मुलांची नावे चंद्रावर पाठवली जाणार

 विवेकानंद विद्यालय चोपडा शाळेच्या मुलांची नावे चंद्रावर पाठवली जाणार

चोपडा दि.२३(प्रतिनिधी ) तालुक्यातील विवेकानंद विद्यालय चोपडा जि. जळगाव शाळेतील इयत्ता सातवी बहिणाबाई वर्गातील 49 विद्यार्थी व विद्यालयातील सर्व शिक्षक  यांच्यासोबत अनेक शेकडो विद्यार्थ्यांची नावे थेट चंद्रावर पाठवली जाणार आहेत 'नासा' या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या 'आर्टेमिस- 2 ' मोहिमेत यांच्या ऐतिहासिक सहभाग नोंदवला जाणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या नावाचे बोर्डिंग पास नासाकडून देण्यात आले आहे. हा क्षण शाळेसाठी अभिमानास्पद ठरत आहे. या मोहिमेत 'व्हर्चुअल गेस्ट 'म्हणून सहभागी होण्याबाबत नासाने आव्हान केले होते. या उपक्रमात विवेकानंद विद्यालयातील तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी विद्यार्थ्यांची व शिक्षकांची नोंदणी केली होती. यशस्वीरित्या विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर नासाकडून विद्यार्थी आणि शिक्षकांचे बोर्डिंग पास पाठवण्यात आले. ते त्यांना मोहिमेत प्रक्षेपण व्हर्चुअल पाहता येणार आहे. या विद्यार्थ्यांची नावे एका एस.डी. कार्ड मध्ये संग्रहित करून ओरियन यांनाद्वारे चंद्राकडे पाठवले जाणार आहे. या उपक्रमासाठी शाळेतील तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते यांची दूरदृष्टी आणि विद्यार्थ्यांच्या विकास करण्यासाठीची धडपड दिसून येते. 'आर्टेमिस- 2 '  ही मोहीम एप्रिल 2026 पूर्वी फ्लोरिडातील केनेडीस्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होईल.अंतराळवीर चंद्राच्या पलीकडे सुमारे सहा लाख पंच्याऐंशी हजार मैल प्रवास करून पॅसिफिक महासागरात पडणार आहे या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, विश्वस्त तथा मुख्याध्यापक नरेंद्र भावे ,चोपडा शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी अजित पाटील, केंद्रप्रमुख दीपक पाटील इत्यादी अनेक मान्यवरांनी या अभिनव नवोउपक्रमात सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने