कुसुंबे येथील चि. पु. कनकभाई राजेंद्र पाटील यांचा समर्पण सोहळा

 कुसुंबे येथील चि. पु. कनकभाई राजेंद्र पाटील यांचा समर्पण सोहळा 


घोडगाव ता. चोपडा,दि.२३( वार्ताहर) येथुन जवळच असलेल्या कुसुंबे येथील चि.पू. कनकभाई राजेंद्र पटेल यांचा समर्पण सोहळा संपन्न होणार आहे. बी.ए.पी.एस (BAPS) संस्थेच्या माध्यमातून मानवसेवेसाठी स्वतःला झोकून देणाऱ्या या महान सुपुत्राचा आपल्याला सर्वांना सार्थ अभिमान आहे. भक्तीच्या या वाटेवर त्यांचे पाऊल अखंड पडत राहो, हीच ईश्वराकडे प्रार्थना."

"उच्च शिक्षण, उज्ज्वल ध्येय, अन सोबतीला भक्तीची ओढ

कुसुंबे गावच्या लेकराने दिला संसाराचा मोह सोड"

आई-वडिलांच्या संस्कारांवर आधारित

"एकीकडे कलयुगाचा प्रभाव असताना, आपल्या एकुलत्या एक सुपुत्राला 'समर्पण सोहळ्या'साठी तयार करणे ही राजेंद्रभाईं व परिवाराची मोठी गुरुदक्षिणा आहे.कनकभाई, तुमच्या या निर्णयाने कुसुंबे गावाचे नाव भक्तीच्या नकाशावर सुवर्णअक्षरांनी कोरले जाणार आहे. गावातील तरुणांसाठी तुम्ही एक आदर्श उदाहरण ठरणार आहात. तुमच्या या नवीन प्रवासाने आपल्या कुसुंबे गावाची माती आज धन्य होणार आहे ! कुसुंबे गावात जन्मलेल्या चि.पू. कनकभाई राजेंद्र पटेल या मातीचा हा सुपुत्र आज 'समर्पण' मार्गावर पाऊल टाकत आहे. उच्चशिक्षण घेऊन संसाराच्या सुखामागे न धावता, आपण ईश्वरी सेवेचा जो मार्ग निवडला आहे, तो  आपल्या संपूर्ण गावासाठी अभिमानाचा विषय आहे. कुसुंबे गावातील हिरा खऱ्या अर्थाने समाजाला प्रकाश देणार आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे!"अशा प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने