नागलवाडी जि. प.केंद्र शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे
चोपडा,दि.१२(प्रतिनिधी) तालुक्यातील नागलवाडी येथील जि.प. केंद्र शाळेत 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रप्रमुख श्री.देवेंद्र भास्करराव पाटील यांनी भूषविले .
यावेळी उपसरपंच श्री. सचिन पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मेघनाथ पाटील, वैशाली पवार ,ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पाटील , अंगणवाडी सेविका, महिला ,पालक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन, ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती. चित्राताई भैय्यासाहेब पाटील यांनी केले. त्यानंतर आदर्श अंगणवाडी सेविका लताताई रवींद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात यशस्वी महिलांची वेशभूषा करून आपले मनोगत सादर केले. शिवजयंती निमित्त समूह नृत्यात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून आकर्षक पॅडचे वाटप करून कौतुक करण्यात आले. महिला पालकांसाठी हळदीकुंकू तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करून बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिगंबर पाटील यांनी केले.तर यशस्वीतेसाठी राजेंद्र शिरसाट ,राहुल दाभाडे, सुजाता बोरसे, सोनाली साळुंखे, कल्पना पाटील ,वंदना बाविस्कर, स्वाती बाविस्कर या सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. वंदे मातरम आणि आभाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
