मुस्तफा एज्युकेशन संस्थेतील शिक्षक भरती वैध अमळनेर सत्र न्यायालयाचा निकाल.. ♦️संस्था चालकांवरील आरोप बिनबुडाचे व निखालस खोटे गुन्हा रद्द झाल्याची अध्यक्षांची माहिती

 मुस्तफा एज्युकेशन संस्थेतील शिक्षक भरती वैध अमळनेर सत्र न्यायालयाचा निकाल.. 

♦️संस्था चालकांवरील आरोप बिनबुडाचे व निखालस खोटे गुन्हा रद्द झाल्याची अध्यक्षांची माहिती 

चोपडा दि.२२(प्रतिनिधी)मुस्तफा एज्युकेशन सोसायटीची भरती प्रक्रिया वैध असून संस्था चालकांवर केलेले आरोप बिनबुडाचे असून दिशाभूल करणारे आहेत.शिवाय नाहक संस्थेला बदनामी करणारे असल्याचं सांगत नुकताच अमळनेर सत्र न्यायालयाने संस्थेच्या बाजुने दिलेल्या निकालावरून स्पष्ट झाले असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेतून संस्था अध्यक्ष अजगर अली मेहबूब अली यांनी दिली आहे. चोपडा न्यायालयाने दिलेला निकाल अमळनेर न्यायालयाने रद्द बातल केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचालित मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व न ज्युनियर कॉलेजमध्ये राबवलेली शिक्षक नियुक्ती प्रक्रिया योग्य असून अध्यक्ष व संचालक मंडळावर दाखल केलेला गुन्हा अयोग्य असल्याचा निर्वाळा अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे. तर चोपडा न्यायालयाने दिलेला आदेश अमळनेर सत्र न्यायालयाने रद्दबातल केला आहे. संस्थेत झालेली शिक्षक भरती प्रक्रिया ही नियमानुसार झालेली असल्यावरही चिरागोद्दिन इंजाबुद्दीन शेख हे नेहमी संस्थेविषयी खोटे आरोप करतात. संस्थेची दिशाभूल करून संस्थेची नाहक बदनामी करतात, असा आरोपही  असगर अली महेबूब अली यांनी केला.

मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे राबवलेली शिक्षक भरती प्रक्रिया अवैध असल्याचा आरोप करत चिरागोद्दिन इंजाबुद्दीन शेख यांनी चोपडा पोलिसांत अध्यक्षांसह १४ जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्या विरोधात संस्थेचे अध्यक्ष असगर अली महेबूब अली, उपाध्यक्ष लियाकत अली सय्यद नूर, सचिव आरिफ अहमद अब्दुल सत्तार, चेअरमन फिरोज खान महबूब खान, सेवानिवृत मुख्याध्यापक अंजुम अहमद कमरोद्दीन व  शिक्षक नाहीद कौसर मलिक बशीर, नाझिया बी इमरान अली, मजहर खान शकील खान, नदीम खान अहसान खान, सईद अब्दुल रशीद, शोएब खान सुलतान खान, मोहम्मद परवेज मोहम्मद हरून, पिंजारी शकील शेख आयुब, मसरत अली हजरत अली यांनी अमळनेर सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. अध्यक्षांची बाजू ऐकून घेत शिक्षक भरती प्रक्रिया योग्य असून संस्थेवर केलेले आरोप खोटे असल्याचा निर्वाळा अमळनेर न्यायालयाने नुकताच दिला असल्याची माहिती अजगर अली यांनी  दिली. या प्रकरणी संस्थेमार्फत अॅड. धर्मेंद्र सोनार, अॅड. असीम सय्यद यांनी कामकाज पाहिले. यावेळी अरमान अली सय्यद, हारून पटेल, जुनैद अली सय्यद, अकील जहागीर आदी हजर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने