चोपडा ग.स.संस्थेत ध्वजारोहणाचा मान मिळाला दिव्यांग शिक्षिका ताईंना

 चोपडा ग.स.संस्थेत ध्वजारोहणाचा मान मिळाला दिव्यांग शिक्षिका ताईंना 


चोपडा (प्रतिनिधी):- जळगाव ग.स.संस्थेच्या चोपडा शाखेत भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण संस्थेच्या दिव्यांग महिला सभासद श्रीमती.शितल रणजितसिंह जाधव (जि.प.प्राथमिक शिक्षिका कन्या नं-२ चोपडा) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला. 

प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे माजी संचालक रमेश शिंदे, माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक  सुनील सूर्यवंशी, विद्यमान संचालक योगेश सनेर, संचालक मंगेश भोईटे,  केंद्रप्रमुख डॉ. भिकन शिरसाठ, दिनेश चौधरी यांची उपास्थित होती. मान्यवरांनी आपल्या भाषणात संस्थेच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. यावेळी राष्ट्रगीतासह, देशभक्तीपर गीते सादर करण्यात आलीत. प्रास्ताविक शाखाधिकारी जगन्नाथ बाविस्कर यांनी केले. याप्रसंगी चोपडा शाखेचे शाखाधिकारी यांचेसह सर्व कर्मचारी बंधुभगिनी उपस्थित होते.  सूत्रसंचालन उपशाखाधिकारी मिना तडवी यांनी तर आभार प्रदर्शन शाखाधिकारी संजय पाटील यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने