चोपडा तहसील कार्यालयात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण..

चोपडा तहसील कार्यालयात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण..

चोपडा दि.१५(प्रतिनिधी) : भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त चोपडा तहसील कार्यालयात ध्वजारोहण    तहसीलदार श्री. भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते  श्री.अनिल भुसारे,सहा.पोलीस निरीक्षक यांचे पोलीस पथकाच्या सलामीने संपन्न झाला.शासकीय अधिकारी,कर्मचारी तसेच नागरी मोठ्या संख्येने उपस्थितीत  होते.ध्वजारोहणानंतर  जिल्हाधिकारी जळगाव यांच्या संकल्पनेने स्वातंत्र्यदिनानिमित्त महसूल विभागामार्फत विविध विभागांचे शासकीय अधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत प्राथमिक स्वरूपाचे सेवांचे/प्रमाणपत्रांचे/आदेशांचे वाटप कार्यक्रम पार पडला.

यावेळी श्री.अरुणभाई गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष, श्री.कैलास पाटील, माजी आमदार, श्री.दिलीपराव सोनवणे,माजी आमदार, श्री.नरेंद्र पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती , श्री.जिवन चौधरी,माजी उपनगरअध्यक्ष ,नरेंद्र पाटील,शहर अध्यक्ष भाजपा,श्री.दिलीप नेवे,सामाजिक कार्यकर्ता,श्री अण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी , श्री अनिल विसावे गटविकास अधिकारी, श्री मधुकर साळवे पोलीस निरीक्षक चोपडा शहर, श्री महेश टाक पोलीस निरीक्षक चोपडा ग्रामीण, श्री.विरेंद्र राजपूत सार्वजनिक बांधकाम विभाग, श्री राहुल पाटील मुख्याधिकारी न.पा., श्री.दिपक साळुंखे तालुका कृषी अधिकारी व इतर शासकीय अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

कार्संयक्रमाचे सुत्रसंचलन केंद्र प्रमुख श्री.देवेंद्र पाटील यांनी तर राष्ट्रगीत व राज्यगीत गायन व वादन विवेकानंद विद्यालय  व कस्तुरबा विद्यालयाने केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने