चहार्डी फाट्यावर विचखेडा बसचा भीषण अपघात होता होता वाचला.. विद्यार्थ्यांनी मारल्या खिडकीतून उड्या
चोपडा दि.२६(प्रतिनिधी) : चोपडा विचखेडा बस चहार्डी फाट्यावर एका साईडला झोल गेल्याने पलटी होता होता वाचली असून सुदैवाने पुढील टळला आहे.रस्त्याने जाणाऱ्या चहार्डी गावातील युवकाने धाव घेत चालकाला सतर्क केले असता चालकाने सावधानता बाळगत प्रवाशांना खाली उतरत अपघातात पासून बचाव करण्यात यशस्वी झाले. दरम्यान या प्रकाराने प्रवाशांची चांगलीच भंबेरी उडाली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
चोपडा- विचखेडा ही बस चोपडा आगारातून निघाली असता अकुलखेडा गाव थांबा करून पुढे चहार्डी गावाकडे वळण घेतांना चालकाकडील बसचे चाके एका साईडने उठली असता बस मधील सर्व प्रवास्यांनी एकदम आरडाओरड केली त्याचवेळी चहार्डी फाट्यावर भिलट बाबा दिंडी जाणाऱ्यांना सोडण्यासाठी आलेले चहार्डी येथिल भुषण कोळी व त्याचे मित्र त्यांचा बस पलटी होत असल्याचे लक्षात आले असता त्यांनी धाव घेऊन सदर बाब चालकाचा निदर्शनात आणुन दिली त्यानंतर बस मधील सर्व प्रवाशांना खाली उतरून घेतले काही विद्यार्थ्यांनी खिडकीतून खाली उड्या घेतल्या तसेच बाकि प्रवाशांनी आपत्कालीन दरवाजातून खाली उतरविण्यात आले सुदैवाने पुढील अनर्थ टळला.
सदर प्रकरणांत चालक यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की दोन गाड्यांचा भार एकाच गाडी मध्ये असल्याने असे झाले तसेच प्रत्यक्ष जागेवर शिरपुर रोड वरून चहार्डी गावाकडे वळण घेण्याचा ठिकाणी चहार्डी गावासाठी अनेर धरणावरून जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या पाईप लाईन साठी रस्त्यावर जेसीबी द्वारे करून पाईप टाकला गेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी रस्ता हा खचला आहे त्यामुळे बस सारख्या मोठ्या वाहनांचा तोल एका साईटला जातो सदर घटनेचा व्हिडीओ चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांना पाठविण्यात आला आहे महेंद्र पाटील हे बांधकाम उपअभियंता चोपडा यांच्याशी संपर्क साधू असे म्हटले आहे.