आडगावचे माजी सरपंच रावसाहेब पाटील यांना नालंदा ऑर्गनायझेशनचा पुरस्कार प्रदान

 आडगावचे माजी सरपंच रावसाहेब पाटील यांना नालंदा ऑर्गनायझेशनचा पुरस्कार प्रदान


चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील आडगाव येथील माजी लोकनियुक्त सरपंच, रावसाहेब ताराचंद पाटील यांना नालंदा ऑर्गनायझेशन या संस्थेने ग्राम समृद्धी योजनेचा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच प्रदान केला.

पुणे येथे एसएम जोशी सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात नालंदा ऑर्गनायझेशन ने ग्रामसमृद्धीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील आडगाव येथील माजी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब ताराचंद पाटील व त्यांचे धर्मपत्नी सौ. कल्याणी पाटील, यांना हे पुरस्कार प्रदान केले. निवृत्त कृषी सहसंचालक श्रीपाद माणिकराव ख ळीकर (नवी दिल्ली) जितेंद्र दाते, विनोद वनवे, अभिजीत आहेर, अभिजीत चौधरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा  संपन्न झाला. या पुरस्काराबद्दल रावसाहेब पाटील यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेत्यांनी अभिनंदनचा वर्षाव केला असून, आडगाव येथील शेतकी संघाचे प्रेसिडेंट, सुनील डोंगर पाटील, चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक, पंडित रामदास पाटील ,शेतकी संघाचे संचालक शामकांतभागवत पाटील, ज्येष्ठ पत्रकार तथा कवी लेखक साहित्यिक रमेश जे .पाटील, प्रगतिशील शेतकरी अंबादास पाटील, दामोदर पाटील, पोलीस पाटील सौ. संगीता गोविंद  पाटील, डॉ विजय पाटील, राजेंद्र विठ्ठल पाटील, मंगल हिरामण पाटील, राजेंद्र पाटील, मधु पाटील, मंगल तात्या, कैलास पाटील, छोटू वार्डे आदींनी  त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने