बाप रे बाप..एस के.नगरात निघाला विषारी साप..! अर्ध्या रात्री आला सर्पमित्र अन् क्षणार्धात बदलले चित्र..!!

बाप रे बाप..एस के.नगरात निघाला विषारी साप..! अर्ध्या रात्री आला सर्पमित्र अन् क्षणार्धात बदलले चित्र..!! 

चोपडा,दि.७ (प्रतिनिधी) : श्रावण महिन्यात कडक ऊन... तापमानात वाढ... दिवसा उन्हाळ्यासारखे वातावरण... श्रावण असूनही मुबलक पाऊस अद्याप पडलेला नाही ? अशा वातावरणात चोपडे शहरातील एस के नगर भागात आणि विशेषता कॉलनी एरियात विषारी सर्पांचे  दर्शन होऊ लागले असल्याने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तर काही शिवभक्त श्रावण महिना असल्याने भोलेनाथाचे दर्शन झाल्याचे समाधान व्यक्त करीत आहेत.

चोपडे शहरातील एस के नगर भागात  महेद्र कानडे यांच्या अंगणात रात्री दीड वाजेच्या सुमाराला महावितरणचे कर्मचारी नितीन महाजन व चंद्रकांत महाजन यांनी या सर्पाला पाहिले मण्यार जातीचा हा सर्प अत्यंत विषारी असून महाजन यांनी सर्पमित्र कुशल अग्रवाल यास बोलावले 

रात्रीच्या सुमारास झोपलेले कुशल अग्रवाल तातडीने सर्प जिथे आहे तिथे दाखल झाले व त्यांनी शिताफीने  या सापाला पकडले. तीन ते साडेतीन फुटाचा हा सर्प त्यांनी पकडून बरणीत बंद केला. कॉलनीत त्यावेळी समाधानाचा सुस्कारा सुटला. नागरिकांमध्ये भय व घबराट निर्माण झाली होती. कॉलनी भागात रात्री अप रात्री अशा पद्धतीचे सर्प निघत असतात नागरिकांनी न घाबरता सर्पमित्रांना पाचारण करावे असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे. 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने