आमदार श्री. सुरेश दामु भोळे (राजु मामा) यांच्या आमदार निधीतून दिव्यांगांना मिळणार २० प्रकारचे साहित्य..11 ऑगष्टला जळगावी तपासणी शिबिर

 

आमदार  श्री. सुरेश दामु भोळे (राजु मामा) यांच्या आमदार  निधीतून दिव्यांगांना मिळणार २० प्रकारचे साहित्य..11 ऑगष्टला जळगावी तपासणी शिबिर 

जळगाव,दि.७(प्रतिनिधी) शहराचे आमदार  श्री. सुरेश दामु भोळे (राजु मामा) यांच्या आमदार स्थानिक विकास निधी 2025-26 अंतर्गत जळगाव शहरातील दिव्यांगांना आवश्यक ते सर्व प्रकाराचे दिव्यांग सहाय्यक साहित्य उपलब्ध करुन देणेसाठी *दिनांक 11 ऑगष्ट 2025 सोमवार रोजी, सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन) टेलीफोन ऑफीसच्या बाजुला, आंबेडकर मार्केट जवळ जळगाव येथे सकाळी 10 ते दुपारी 2* या वेळात तपासणी शिबीराचे आयोजन जिल्हा रुग्णालय जळगाव व इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC) जळगाव यांच्या सहभागाने करण्यात येत आहे.

सदर तपासणी शिबीरात अस्थिव्यंग, कर्णबधीर, अंध प्रवर्गातील दिव्यांगांना लागणारे आवश्यक असे अत्याधुनिक प्रकाराचे सहाय्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी तपासणी करण्यात येणार आहे. शिबीरात तिनचाकी सायकल, व्हिलचेअर, कमोड चेअर, सी.पी. चेअर, वॉकर, एलबो स्टिक, वॉकींग स्टिक, कुबड्या तसेच हाय टेक जयपुर फुट, कॅलीपर, कर्णयंत्रे, इलेक्ट्रॉनिक्स अंध काठी, सहाय्यक उपकरणे व कृत्रीम अवयवे इ. 20 प्रकाराचे साहित्य शिफारस करण्यात येणार आहे. 

तरी सदर शिबीराचा लाभ घेण्यासाठी फक्त जळगाव शहरातील दिव्यांग व्यक्तींनी आपले युडीआयडी (दिव्यांग) प्रमाणपत्र, आधारकार्ड व फोटो यांच्या प्रत्येकी 4 झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. असे आवाहन माननीय आमदार महोदय श्री. सुरेश दामु भोळे (राजु मामा) यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने