आदित्य पाटील अंकगणितीय स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

 आदित्य पाटील अंकगणितीय स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

लासुर ,ता. चोपडा दि. 7(प्रतिनिधी): शिरपूर येथील आर सी पटेल इंग्लिश स्कूलचा दुसरीच्या वर्गातील विद्यार्थी आदित्य कपिल पाटील हा एस आय पी अकॅडमी च्या दहाव्या राष्ट्रीय अंकगणितीय आंतरशालेय स्पर्धेत द्वितीय फेरीतील टॉप फाइव्ह मध्ये आला असून त्याने 60 स्कोर मिळवला आहे. टॉप फाईव्ह मध्ये स्थान मिळवल्याने तो या स्पर्धेच्या राज्यस्तरीय तृतीय फेरीसाठी पात्र ठरला आहे.विद्यार्थ्यांमधील गणितीय कौशल्य विकासासाठी ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरापर्यंत घेतली जाते.त्यासाठी विविध टप्प्यात ही परीक्षा होते. आदित्य हा गणपूर येथील कपिल पाटील यांचा मुलगा असून सकाळ चे बातमीदार ऍड. बाळकृष्ण पाटील यांचा नातू आहे.या यशाबद्दल आदित्य चे अनेकांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने