प्रेमी युगल पळाले..अन् संशयित आरोपींतांचे कपडे गळाले..!हिडीस कृत्य करण्यास भाग पाडणारे पीएसआय साजन नारहडे झाले "डीसमिस"
चोपडा दि.27(प्रतिनिधी)तालुक्यातील एका गावातील प्रेम विवाह प्रकरणात मुलीला पडून जाण्यात मदत करण्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या चौघांपैकी तिघांना कस्टडीत कीडसवाणे अश्लील कृत्य करून घेणाऱ्या पीएसआय साजन नाहर्डे यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले असल्याचा दुजोरा जिल्हा पोलीस कार्यालयातर्फे देण्यात आला आहे.अधिकाराचा गैरवापर करून मानवतेला काडी फासण्याचे कृत्य जबरीने करून घेण्याच्या प्रकार केल्याने संबंधित पीएसआय ला तात्काळ अटक करून शिक्षा करावी अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे
याबाबत प्राप्त माहिती अशी की,चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गेल्या २२ तारखेला चोपडा तालुक्यातील एका गावातील आदिवासी समाजातील मुलगा -मुलगी हे प्रेम विवाह करण्यासाठी पळून गेले. यावरून मुलीचे आई-वडीलांनी आपल्या मुलीस पळवण्यामागे गावातील संशयित महिला व संशयित विलास ,इंदर , गोविंदा यांना चौकशीसाठी दुपारी एक वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलाविले होते त्यावेळी उपनिरीक्षक साजन नार्हेडा यांनी तुमच्या गावातील तुमच्या समाजातील जो मुलगा मुलीला घेऊन पळाला आहे. त्याच्यात तुमचा हात असल्याचे सांगितले जात आहे.अशी शहानिशा करीत असताना घटनेशी आमचा तिळमात्र सबंध नाही असे सदरील महिलेने सांगितले असता पीएसआय साजन नार्हेडा त्याचा राग आला व चारही लोकांना पट्ट्याने बेदम मारहाण केली त्यानंतर संशयित महिलेस सोडून तिघा तरुणांना वेगळ्या खोलीत घेऊन विवस्त्र होण्यास भाग पाडले असे आरोपीतांचे म्हणणे आहे. हा प्रकार पोनि अनिल भवारी यांना माहीत होताच त्यांनी पीएसआय साजन नाहरडे यांच्या विरोधात कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविला असता जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी निलंबन केल्याचा दुजोरा जिल्हा कार्यालयाने दिला आहे.दरम्यान आदिवासी संघटनांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.यासंदर्भात चोपड्याचे डीवायएसपी आण्णासाहेब घोलप यांनी संबंधित निलंबित पोलीस उपनिरीक्षक साजन नार्हेडा यांची विभागीय चौकशी सुरू असून चौकशी दरम्यान जे काही निष्पन्न होईल त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे म्हटले आहे.