चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात नुकतेच आलेले पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांची पुन्हा नाशिक ग्रामीण बदली

 चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात नुकतेच आलेले पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांची पुन्हा नाशिक ग्रामीण बदली 

चोपडा दि.२९(प्रतिनिधी)ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर नुकतेच विराजमान झालेले पोनि अनिल  भवारी यांच्या नियुक्तीला महिनाही ही पूर्ण होत नाही तोवर पुन्हा त्यांची नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. 30 जुलै रोजी ते १ ऑगष्टपर्यंत ते चोपडा ग्रामीण सोडून नाशिकची  सुत्रे हाती घेणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.

 पोलीस खात्यात धडाकेबाज नीडर व व गुन्हेगारांच्या कर्दनकाळ म्हणून ओळख असलेले  मित स्वभावी पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याची सुत्रे हाती घेताच गावठी कट्टा, गावठी दारू व अवैध धंदे चालकांविरुद्ध मोहिम उघडली होती.याचा प्रारंभ म्हणून  प्रथमच गलंगी, उमरटी सत्रासेन या परिसरात गुन्हेगारांची माहिती देण्यासंदर्भात जनजागृती पर फलक लावण्या सुरुवात केली होती.त्यात पोलीसांचा नंबर जाहीर करून गुन्हेगारांची माहिती देण्यास जनतेला जाहीर आवाहन करण्यात आले होते.हे  गुन्हेगारांचा बिमोड  करण्यासाठी उचललेले अनोखे पाऊल अनेकांना  भावले होते. मात्र  वरिष्ठ पातळीवरून त्यांची नुकतीच नाशिक ग्रामीण पोलिसात बदली झाली आहे त्यांच्या जागी श्री. पवार नामक  पीआय दाखल होण्याची चर्चा असून या आडनावाचे चित्र मात्र अजून तरी अस्पष्ट असल्याचे जिल्हा पोलीस कार्यालयामार्फत क्लिअर करण्यात आले आहे. एकंदरीत चोपडा ग्रामिण पोलिसांत नवे लाभणारे पोलीस अधिकारी नवे काहीतरी जोमाने करतील अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने