पोवाड्याच्या माध्यमातून शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर सादर

 पोवाड्याच्या माध्यमातून शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर सादर 


चोपडा,दि.२ ( प्रतिनिधी) चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय व अध्यापक विद्यालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली. शाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.दीक्षा शिरसाठ आणि त्यांच्या समूहाने स्वागत गीत सादर केले. अध्यापक विद्यालयातील विद्यार्थिनींनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या माहितीवर आधारित हस्तलिखित केलेल्या झेप या अंकाचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.

जया बोरसे ,राजश्री पाटील ,समाधान महाजन ,पूजा मैराळे, दिपाली सोनवणे ,उज्वला पाटील इ..विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून घेतला. शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या आयक्यूएसी कमिटीचे सदस्य श्री गोविंद गुजराथी हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाविषयी आवड निर्माण करून थोर महात्म्यांचे चरित्र वाचावे वाचनातून माणूस समृद्ध होतो व त्याचे व्यक्तिमत्व विकसित होते म्हणून सातत्याने विद्यार्थ्यांनी वाचनाचा व्यासंग जोपान्याचे  आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.श्री एम. पी. पाटील यांनी  केसरीतून व मराठा या वृत्तपत्रातून आपले विचार प्रखरपणे मांडणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील कार्याचा आढावा घेतला. एलसीडी प्रोजेक्टर च्या साह्याने अण्णाभाऊ साठें वर आधारित पोवाडा सादर करण्यात आला. व अण्णाभाऊंचे संपूर्ण जीवन चरित्र विद्यार्थ्यांना माहीत करून देण्यात आले. याप्रसंगी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. रजनी सोनवणे ,अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्रा.श्री किरण पाटील प्रा. एन. डी.वाल्हे, प्रा .एम एन मराठे, प्रा.सुजय धनगर , प्रा .मीनल पाटील, प्रा. रुश्मी  शेख, प्रा . पुजा माळी ,विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख प्रा .डॉ.सविता जाधव, ग्रंथपाल एम एल पटेल व तंत्रसायक शुभम गुजराथी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री धनगर या विद्यार्थिनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. सविता जाधव यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने