वाळकी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात पारडू ठार.. शेतकरी हवालदिल..वन विभागाने ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी
चोपडा दि.7(प्रतिनिधी)तालुक्यातील वाळकी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून गेल्या पंधरवड्यात दोन म्हशी, गाईचा बछडा व म्हशीच्या पारडूचा फडशा पाडला पाडला असल्याने शेतकरी वर्गामध्ये मेथीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच शेतात जाण्यास शेतमजुरी ही धजावत नसल्याने सामाजिक वनीकरण विभागाने तात्काळ बिबट्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी पुढे येत आहे.
वाळकी गावातील शेतकरी लोटन भिला कोळी यांची म्हशीचे पारडूवर बिबट्याने 4 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी रात्रीच्या सुमारास हल्ला चढवून ठार केले आहे .तरी सदरील शेतकऱ्यांने नुकतेच कर्ज काढून म्हैस व पारडू घेतलेले होते. त्यातच बिबट्याने पारडूला फस्त केल्यामुळे म्हैस दूध देत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी पुरता खचला आहे.
या भागात केल्या महिन्याभरापासून बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने मजुर वर्गात धास्तीचे वातावरणात निर्माण झाले असल्याने शेतीचे कामे खोळंबली आहेत.तरी वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना प्रशासकीय स्तरावरून तातळीने मदत मिळावी अशी मागणी होत आहे.