महसूल सप्ताह निमित्त चहार्डी गावी DBT शिबीर संपन्न

 महसूल सप्ताह निमित्ताने चहार्डी गावी   DBT शिबीर संपन्न 

चोपडा दि.५(प्रतिनिधी) : आज दि.05/08/2025 रोजी महसूल सप्ताह निमित्त नियोजित कार्यक्रमानुसार संजय गांधी योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थ्यांसाठी व पुरवठा विभागातील लाभार्थ्यांसाठी DBT शिबीर चहार्डी मंडळ भागासाठी, महादेव मंदिर परिसर, चहार्डी  येथे आयोजित करण्यात आले होते. तरी ज्या लाभार्थ्यांचे अदयाप DBT आधारकार्ड प्रमाणिकरण झालेले नाही त्यांची यादी संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना पुरविण्यात आलेली होती. सदर DBT शिबीराचा लाभ संबंधित लाभार्थ्यांनी घेणेबाबत महसूल प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले होते. तरी सदर लाभार्थ्यांना सकाळी  10.00 वाजता शिबीरामध्ये आधारकार्ड झेरॉक्स व आधारकार्ड संलग्न मोबाईल नंबरसह न चुकता उपस्थित राहणेबाबत कळविण्यात आले होते. सदर शिबीरात चहार्डी मंडळातील चहार्डी, घाडवेल, विचखेडा, धुपे बु., धुपे खु., भार्डू, अकुलखेडा, वेले, मजरेहोळ, निमगव्हाण, तांदलवाडी व दोंदवाडे या गावांमधील लाभार्थ्यांचे DBT आधारकार्ड प्रमाणिकरण करण्यात आले आहे. एकुण 232 लाभार्थ्यांचे DBT आधारकार्ड प्रमाणिकरण करण्यात आले आहे.  

सदर शिबीर श्री. भाऊसाहेब थोरात, तहसिलदार चोपडा यांचे मार्गदर्शनात घेण्यात आले आहे. सदर  शिबीरास श्री. दत्तात्रय सैंदाणे नायब तहसिलदार संगायो, श्रीमती मेश्राम मॅडम नायब तहसिलदार पुरवठा शाखा, श्रीमती मेघना गरूड पुरवठा निरीक्षक व श्री. तिलेश पवार तलाठी चहार्डी, श्री. समाधान कोळी, ऑपरेटर संगायो तसेच चहार्डी  मंडळातील तलाठी व कोतवाल, युवा प्रशिक्षणार्थी यांनी उपस्थित राहून कामकाज केले. DBT प्रणालीव्दारे लाभ थेट आणि पारदर्शक पध्दतीने  लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे, तसेच योजनांचा लाभ सर्व पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे या शिबीराचे मुख्य उदिदष्ट होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने