वाळकीच्या ५८ वर्षीय ईसमास अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी ४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
चोपडा,दि.१२(प्रतिनिधी) तालुक्यातील वाळकी येथील अठ्ठावन वर्षीय अशोक देवराम पाटील याला अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याबद्दल चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश १ सी.व्ही. पाटील यांनी सुनावली आहे.
ही घटना २०२३ मध्ये घडली तेव्हा आरोपीने पीडितेला म्हणजे स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलीला, तिचे आईवडील कामावर गेलेले असताना गोड बोलून घरात बोलवून गैर वर्तन केले होते.तेव्हा पीडित मुलगी कशी बशी पळून जाण्यात यशस्वी झाली आणि तिने तिच्या पालकांना माहिती दिली, याबाबत चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली.व आरोपीला अटक करण्यात आली होती.याप्रकरणी अमळनेर
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सी.व्ही. पाटील यांनी यांच्या न्यायालयात खटला सुरू होता.यात सरकारी वकिल के.आर.बागुल यांनी सात साक्षीदार तपासले फिर्यादी, अल्पवयीन पीडिता, प्रत्यक्षदर्शी व तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवालकर यांच्या साक्षी घेण्यात आल्या. न्यायाधीश सी व्ही पाटील यांनी आरोपीस पॉक्सो कलम आठ अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड (दंड न भरल्यास दोन महिने) आणि कलम 12 अंतर्गत एक वर्षाचे सश्रम कारावास व१ हजार रुपये दंड अशी एकूण चार वर्षाची शिक्षा सुनावली आहे.