कै हि मो करोडपती विद्यालयात त्रिशा फॉउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वितरण
🟧डॉ सतीश बेहडे व परिवाराचा स्तुत्य उपक्रम
चोपडा दि.१२(प्रतिनिधी) येथील कै हि मो करोडपती माध्यमिक विद्यालयात त्रिशा फॉउंडेशन, चोपडा तर्फे गरीब, होतकरू व आदिवासी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण डॉ कल्पेश बेहडे, डॉ प्रियंका बेहडे मॅडम व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना नोटबुक, रंगपेटी, दप्तर आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण केले व यावेळी इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी च्या किशोरवयीन मुलींना सॅनेटरी पॅड नॅपकिनचे वाटप करण्यात आले.
चोपडे शहरात व तालुक्यात गेल्या 45 वर्षांपासून दंतरोग चिकित्सक म्हणून सेवा देत असलेले, त्रिशा फॉउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ सतीश बेहडे यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून व संकल्पनेतून शहरातील गरीब, होतकरू विद्यार्थांना विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते.
त्यानुसार विद्यालयातील आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मदत व्हावी व प्रोत्साहन मिळावे.या उदात्त हेतूने परिवारातील सदस्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले.याप्रसंगी मुख्याध्यापक श्री मंगेश भोईटे यांनी संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने या उपक्रमा बद्दल आभार मानले.
याप्रसंगी श्री आर आर बडगुजर, श्री ए पी बडगुजर सर,श्रीमती सी पी बडगुजर, श्रीमती व्ही बी साळुंखे, श्रीमती पी सी बडगुजर, श्रीमती एस टी बोरसे, श्रीमती शर्मिला बडगुजर, श्री संजोग साळुंखे उपस्थित होते.* कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी श्री अशोक बडगुजर, श्री सुनील बडगुजर यांनी सहकार्य केले.