जागतिक आदिवासी दिनी माजी आमदार लताताई सोनवणे हयांनी चोपड्यात बांधल्या भावांना राख्या

 जागतिक आदिवासी दिनी  माजी आमदार लताताई सोनवणे हयांनी चोपड्यात बांधल्या भावांना राख्या

चोपडादि.१२(प्रतिनिधी )।  तालुक्यातील लोकप्रिय माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात रक्षाबंधनाच्या दिवशी शिवसेना पदाधिकारी आणि आदिवासी बांधव बबलू बारेला सह शिवसेना कार्यकर्त्यांना राख्या बांधल्या. यानिमित्त त्यांनी तालुक्यातील सर्व भावांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व आदिवासी बांधव उपस्थित होते. माजी आ. सौ. लताताई सोनवणे यांनी तालुक्यात विकासाची गंगोत्री आणली आहे. रक्षाबंधनानिमित्त आदिवासी बांधवांना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राखी बांधून त्यांनी शुभेच्छा दिल्या. विशेषबाब म्हणजे चोपडा तालुका हे माजी आ.सौ. लताताई सोनवणे यांचे माहेर असून त्यांनी राख्या बांधल्यामुळे सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण दिसून आले.

आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आ. सौ. लताताई सोनवणे यांनी तालुक्याच्या विकासासाठी विविध योजना कार्यान्वीत करून त्यांना चालना दिली आहे. अनेक विकासाच्या योजना त्यांनी राबविल्या आहेत. शेतकरी, शेतमजूर, यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बंधू-भगिनींना रक्षाबंधनानिमित्त तालुक्याच्या माजी लोकप्रिय आमदार सौ. लताताई सोनवणे यांनी आदिवासी बांधव बबलू बारेला दत्ता पावरा, प्रल्हाद पावरा, नकूल पावरा, लालू पावरा व प्रताप पावरा तसेच शिवसेनेचे पदाधिकारी यांना राख्या बांधल्या. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने