दातृत्वशाली जयेश व सौ.मिनल बेहडे दाम्पत्याकडून कमला नेहरू मुलींच्या वस्तीगृहात शालेय साहित्य व सॅनिटरी पॅड वाटप

 दातृत्वशाली जयेश व सौ.मिनल बेहडे दाम्पत्याकडून  कमला नेहरू मुलींच्या वस्तीगृहात शालेय साहित्य व सॅनिटरी पॅड वाटप


चोपडा दि.13(प्रतिनिधी)तालुक्यातील सुप्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर सतीशजी बेहडे यांचे चिरंजीव जयेश सतीश बेहडे व पत्नी सौ मिनल जयेश बेहडे या दाम्पत्याने गरजू गरजवंत आदिवासी विद्यार्थिनींना शालेय साहित्य व  सॅनिटरी पॅड देऊन मोलाचा हात दिलेला आहे 

शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था संचलित कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात अत्यंत हलाखीची दयनीय परिस्थिती असलेल्या विद्यार्थिनी निवासीत असल्याची माहिती घेत  जयेश सतिश बेहडे व सौ.मिनल बेहडे यांनी वस्तीगृह गाठून सर्व विद्यार्थीनींशी चर्चा करून वही, कंपास व सॅनेटरी पॅड देऊन मुलींना हातभार दिला आहे. त्यांच्या दातृत्वशाली  हृदयाला सलामी ठोकत स्वागत गीत गाऊन विद्यार्थ्यांनी जोरदार स्वागत केले. विद्यार्थींनींच्या शैक्षणिक अडीअडचणी समजावून घेत वेळोवेळी  मदतीसाठी धावून येण्याचे आश्वासित केले. या यावेळी वस्तीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ यांनी  बेहडे परिवार नेहमीच गरजवंताच्या पाठीशी उभे राहत असल्याने त्यांचे आभार मानले.प्रसंगी अधीक्षिका कावेरी कोळी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने